17 वर्ष देशाची सेवा करुन गावात परतणाऱ्या जवानाचं जंगी स्वागत


बीड : सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच क्षण बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. 17 वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका जवानाचं बीड जिल्ह्यात अख्ख्या गावाने स्वागत केलं.
प्रकाश खारोडे यांनी 17 वर्ष सीमेवर देशसेवा केली. सेवानिवृत्त होऊन गावी आल्यानंतर घोड्यावर बसवून, बँड बाजा वाजवून त्यांचं स्वागत केलं. बँडच्या तालावर ताल धरणाऱ्या लेझीम पथकनेही या स्वागतामध्ये भर टाकली. संपूर्ण गाव पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी उभं होतं. बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील हे सर्व सेलिब्रेशन आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रकाश खारोडे हे सैन्य दलातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना अनोखी भेट म्हणून गावातील नागरिकांनी एक समिती तयार केली. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून गावभरात स्वागताचे बॅनर्स लावले होते. घरोघरी रांगोळी काढण्यात आली. अचानक झालेलं हे स्वागत पाहून जवान प्रकाश खारोडे भारावून गेले.

देशसेवा करून गावी पोहोचल्यावर संपूर्ण गाव भावुक झालं होतं. जवानाच्या स्वागताला संपूर्ण गावंच नव्हे, तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनीही हजेरी लावली. यावेळी पूर्ण गाव सजून-धजून उभं होतं. सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबीयांना… जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते. जवानाचा गावात प्रवेश होताच तोफांची सलामी देऊन कुटुंबाच्या वतीने गोड भरवून त्यांचं औक्षण करण्यात आलं. 17 वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget