सिझेरियन झालेल्या 14 महिलांना एकादाच इन्फेक्शन, यवतमाळमध्ये खळबळ


यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरियनने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरियन झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली. परंतु थोडी कळ सोसा, असे सांगत त्यांना अंधारात ठेवण्यात आले. एवढे दिवस कसले उपचार सुरू आहेत, याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर प्रकरणाचा भांडाफोड झाला. याबाबत जास्त कुरबूर केल्यास थेट धमकावले जाते, असा आरोप प्रसूत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रसूती झालेल्या महिलांना टाक्यांमध्ये (टिचेस) इन्फेक्शन झाले असल्याची बाब पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयातील हलगर्जीपणा पुढे आला आहे. या विभागातील एकूण 14 महिलांना अशाच प्रकारचे इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे.

पुसद तालुक्यातील ज्ञानेश्वर पैठणकर यांच्या पत्नीला बाळंतपणासाठी दाखल केले. त्याचे 21 एप्रिलला त्याचे सीझर करण्यात आले. मात्र त्यानंतर 4 ते 5 दिवसांनंतर सुट्टी मागितली असता टाके ओले असल्याचे कारण सांगून थांबविण्यात आले. मात्र रुग्णाला सीझर केलेल्या ठिकाणी टाक्यांमधून रक्तस्राव होत होता. शिवाय वेदना सुद्धा होत होत्या. याबाबत संबंधित विभाग प्रमुखाला सांगितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन उपचार सुरु असल्याचे सांगतले. 8 मेपर्यंत डॉक्टरांनी हीच उत्तरं दिली. त्यानंतर 9 मे रोजी बधीर न करता पुन्हा नव्याने टाके मारण्यात आले आणि रुग्णाला तडफडत ठेवले असल्याचा आरोप सुद्धा नातेवाईकांनी केला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget