अमेरिकेत 136 प्रवाशांसह विमान नदीत कोसळलं


न्यूयॉर्क : अमेरिकेतील फ्लोरिडा इथं मोठी विमान दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेलं विमान थेट नदीत कोसळलं. बोईंग 737 हे विमान क्यूबावरुन फ्लोरिडाकडे येत होतं. त्यावेळी लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. या विमानात 136 प्रवासी होते. धावपट्टीवरुन विमान थेट नदीत कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, विमानातून बाहेर काढलेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्वजण सुखरुप असून, कोणाला खरचटलेलंही नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान फ्लोरिडाच्या नौदलाच्या विमानतळ जॅक्शनविले इथल्या रन वे अर्थात धावपट्टीवरुन घसरलं आणि थेट सेंट जॉन नदीत जाऊन कोसळलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget