May 2019
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे.

“राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही.” असे काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.


“मुंबई काँग्रेसमध्ये आता वाद होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण आधी ते आरोप करायचे माझ्यावर. आता त्यांनी कोणावर आरोप करण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याची काळजी सध्याच्या नेतृत्वानं घेण्याची गरज आहे.” असे म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला.कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीतील हल्ल्यानंतर कोलकात्यात प्रचाराचा कालावधी कमी करण्यात आलाय. यावरुन ममता दीदींनी भाजपवर आरोप करत, हा मोदी-शाह यांचा निर्णय असल्याचं म्हटलंय. तर भाजपसाठी त्यांनी एक्झिट पोलही सांगितलाय. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचं ममता म्हणाल्या.

आंध्र प्रदेश 0…. तामिळनाडू 0… महाराष्ट्र 20.. 200 जागा गेल्या, असं म्हणत ममतांनी भाजपवर टीका केली. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातील आठ राज्यांमध्ये 59 जागांसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. कारण, 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दुसरीकडे होणारं नुकसान बंगालमध्ये भरुन काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

अमित शाह यांच्या रॅलीत झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत केली. शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपणार होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ममतांनी जोरदार टीकाही केली. भाजपने टीएमसीच्या कार्यकर्त्यांना गुंडांची उपमा दिली आहे, तर ममतांनीही आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय.


नवी दिल्ली : एक राजकीय नेता म्हणून प्रतिमा सुधारण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना गेल्या काही वर्षात यश आलंय. पण एका चुकीचाही या सर्व प्रयत्नांना कसा फटका बसतो ते एका उदाहरणातून समोर आलंय. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘स्मार्ट’ टीका केली होती. याचं कौतुकही झालं, पण ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या उत्तरानंतर राहुल गांधींचा डाव त्यांच्यावरच उलटला.

राहुल गांधींनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आणि इंग्रजी शब्दकोशात एका नव्या शब्दाचा समावेश झाल्याचं सांगितलं. याबाबतचा एक स्क्रीनशॉटही त्यांनी टाकला होता. या पोस्टमध्ये त्यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या वेबसाईटचं पेजही शेअर केलं होतं, ज्यात ‘मोदीलाई’ ( Modilie ) हा शब्द होता. या शब्दाचे तीन अर्थ देण्यात आले होते. सत्य सतत बदलणारा, सवयीनुसार सतत खोटं बोलणे आणि विचार न करताच खोटं बोलणे असे तीन अर्थ या शब्दाचे होत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं होतं.सांगली May 16, 2019 at 9:00 pm
818 Views0


सांगली : कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या मुलाला मगरीने पाण्यात ओढल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज गावात घडली आहे. आकाश मारुती जाधव असं या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. दुपारच्या वेळी आकाशची बहीण नदीच्या काठावर कपडे धूत होती. त्यावेळी आकाश पाण्याच्या जवळ बसला असताना मगरीने अचानक हल्ला केला आणि त्याला पाण्यात ओढलं.

मगर आकाशच्या शरीराला एक तास तोंडामध्ये घेऊन पाण्यात फिरत होती. याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि वन विभागाकडून मुलाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. पण त्याला शोधण्यात अजूनही यश आलेलं नाही. आकाशचे वडील नदी किनारी असलेल्या विटभट्टीवर काम करतात.

कृष्णा नदीपात्रात मगरींचा प्रजननकाळ सुरु आहे. सकाळीही नर आणि मादी मगरींची प्रणयक्रीडा सुरु असल्याचं दिसून आलं होतं. गुडघाभर पाण्यातही मगरींचा वावर दिसल्याने आसपासच्या लोकांनी तिथून पळ काढला. पण या लहानग्याला त्याची माहिती नसल्याने तो काठावरच बसून होता. दुपारच्या सुमारास नदी काठावर येऊन मगरीने मुलाला ओढून नेलं आणि काही वेळाने सोडलंही. पण हा मुलगा नदीच्या पाण्यात पडल्याने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने मुलाचा शोध घेतला, पण त्याला शोधण्यात अजून यश आलेलं नाही.

Image result for साध्वी प्रज्ञा सिंह
नवीदिल्लीः नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, या भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी म्हटले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय पक्षांकडून भाजपवर टीका होऊ लागल्यानंतर नरसिंहराव यांनी माफीची मागणी केली आहे.

Image result for साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ: नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहील असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणार्‍या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

भोपाळमधून साध्वी प्रज्ञासिंह या निवडणूक लढवत आहेत. हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले आहे. अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे म्हटले होते. त्यानंतरही वाद निर्माण झाला होता. नथुरामबाबत प्रश्‍न विचारला असता प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटले आहे.


मुंबई : ठाण्यामध्ये मनसे आणि भाजपमध्ये चाललेला वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीये . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे महाराष्ट्रातील मनसे पदाधिकारयांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर मनसेने शेतक-यांसाठी एल्गार पुकारला असून १७ मेला ठाण्यात महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी सहभागी होणार असून मनसेचे मुंबईसह महाराट्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते येणार असल्याचे मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. गावदेवी मैदान ते ठाणे महानगरपालिका दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी अविनाश जाधव, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी मनसे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. ठाण्यात ९ मे रोजी मनसेने त्यांच्या कार्यालयाबाहेर आंबा विक्रीसाठी एका शेतकरी कुटुंबियांना स्टॉल लावू दिला. रत्नागिरीहून आलेल्या शेतकरयांनी लावलेला हा स्टॉल अनधिकृत असल्याचं सांगत भाजपाने हा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले.

ठाण्यात झालेल्या मेळाव्यात राज यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली. शेतकरयांना थेट शेतमाल विक्रीचं सरकारचं धोरण आहे, मग ठाण्यातील आंबे विकणारया शेतकरयांनी काय घोडं मारलं होतं. महाराष्ट्रातील शेतकरयांचं भलं होतंय तर त्याला विरोध का होतोय? असा सवाल राज यांनी केला.

यानंतर मनसे शेतकरयांच्या न्याय हक्कांसाठी आक्रमक झाली आहे. नाशिकमधले कांदा विक्रेते, सांगलीमधले ऊस विक्रेते, रत्नागिरीतील आंबा विक्रेते, पालघरमधील आदीवासी लोक जे डोंगरात शेती करतात आदी शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात ८ ते १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियही सहभागी होणार आहेत. मनसेद्वारे या शेतकरयांसाठी मैदान, हॉल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी मुद्यासोबत येत्या काही दिवसांत ठाण्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावरून मनसे आक्रमक होण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.


मुंबई : भारतीय जनता पक्षाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणार नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत. भाजप सर्वात मोठा ठरू शकतो पण बहुमत नसतानाही मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. मोदी सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांचे सरकार टिकणार नाही. वाजपेयी यांचे बहुमताअभावी १३ दिवसात जसे सरकार कोसळले होते तसे मोदी सरकार कोसळेल असे भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वर्तविले.

शरद पवार सध्या राज्यातील दुष्काळी भागातील दौ-यावर आहेत. त्यांच्यासमवेत नातू रोहित पवार हे सुद्धा आहेत. पवार यांनी नातू रोहित याच्यासोबत प्रथमच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी पवारांनी वरील भाकीत केले.

शरद पवार म्हणाले की, भाजपचे लोक आम्हाला ३०० जागा मिळतील असे सांगतात पण त्याला काही अर्थ नाही. जर उद्या भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रपती संसदेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. पण मोदींना बहुमत सिद्ध करता येणार नाही. अटलजी १३ दिवसाचे पंतप्रधान झाले. तसेच आता झाल्यास मोदी १३ किंवा १५ दिवसाचे पंतप्रधान असतील असा टोला त्यांनी लगावला.

भाजपविरोधी पक्षांची बैठक २१ मे रोजी होणार आहे. यावेळी सगळे पक्ष एकत्र बसून पुढील रणनितीबाबत चर्चा करतील. पुढील पाच वर्षासाठी देशाला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. यात कोणताही घोडेबाजार होणार नाही. एकत्र बसून ज्याच्या नावावर सहमती होईल त्याला कोणतेही अपेक्षा न ठेवता मदत करू असेही पवारांनी स्पष्ट केले.


मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. ई मेलद्वारे वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे आदित्य पांचोलीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. सुमारे 13 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे.

काही वर्षांपूर्वी कंगना आणि आदित्य पांचोली हे दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. मात्र दोघांमधील वादाने टोक गाठलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत आदित्य पांचोलीविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

आदित्य पांचोलीचीही तक्रार

दरम्यान, आदित्य पांचोलीनेही काही दिवसांपूर्वी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार त्या तक्रारीला उत्तर आहे जे दशकापूर्वी कंगना आणि तिची बहीण रंगोलीने दाखल केली होती. कंगना आणि तिच्या बहिणीने आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

आदित्य पांचोलीही आता कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कंगनाच्या वकिलाने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आदित्यचा आहे. त्यासाठी आदित्य पांचोलीने काही व्हिडीओ, फोन रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहेत.


मुंबई : मुंबईच्या 23 वर्षीय कॅप्टन आरोही पंडीत यांनी नवा विश्वविक्रम केला आहे. लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने आरोही यांनी अटलांटिक महासागर पार केला आहे. अंटलांटिक महासागर पार करणारी आरोही ही पहिली महिला ठरली आहे.

आरोहीने 13-14 मेच्या मध्यरात्री लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने युकेमधील स्कॉटलँड या ठिकाणाहून एकटीने उड्डाण घेतले. या हवाई यात्रेदरम्यान ती आईसलँड आणि ग्रीनलँड या दोन ठिकाणी थांबली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तिने 3000 किमीची हवाईयात्रा पूर्ण केली. त्यानंतर तिने कॅनडातील Iqaluit विमानतळावर लँडिंग केले.

भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने ‘महिला सशक्ती अभिनयानां’तर्गत, We Women Empower Expedition (‘वी! एक्सपीडिशन’) नावाची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तीन टप्प्यांत संपूर्ण जगभर या एअरक्राफ्टने प्रवास करत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश दिला जाणार आहे. या अंतर्गत आरोहीने हा विश्वविक्रम केला आहे.

आरोहीचे या नवीन उड्डाण भरारीचे जगभरात कौतुक होत आहे. तसेच अटालांटिक महासागर पार करणारी पहिली महिला ठरली आहे.

”मी देशाची आभारी आहे. अटलांटिक महासागर एकटीने पार करण्याचा विलक्षण अनुभव होता. खाली निळा बर्फाप्रमाणे भासणारा समुद्र, वर निळे आकाश आणि त्यात छोटेसं विमान अस आरोहीने या यात्रेचं वर्णन केलं आहे.”

तसेच जगातील कोणतीही महिला अटलांटिक महासागर विमानाच्या सहाय्याने पार करु शकते, फक्त त्यासाठी जिद्द हवी अस म्हणत आरोहीने महिलांना प्रोत्साहित केलं आहे.


नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये काल रात्री झालेल्या राड्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांच्या गुंडांनी आमच्या रॅलीवर हल्ला केला. ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद यांचा पुतळा तोडला. ममतांनी स्वत:ला देव समजू नये. ममतांच्या या अरेरावीला बंगाली जनताच उत्तर देईल. भाजप इथे 23 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल”, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.

मागील काही निवडणुकांमध्ये ममतांच्या गुंडांनी आमच्या 7 कार्यकर्त्यांची हत्या केली. आम्ही पूर्ण भारतात निवडणूक प्रचार केला. सहा टप्प्यात कुठेही हिंसा झाली नाही, पण पश्चिम बंगालमध्येच हिंसा होत आहे. पाश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. निवडणूक आयोग इथे मूग गिळून गप्प आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला.

ममता बॅनर्जींनी स्वत:ला देव समजू नये. बंगाली जनताच त्यांना उत्तर देईल. 23 मे रोजी ममतांची सद्दी संपेल, असं अमित शाह म्हणाले. शिवाय कालच्या रोड शो मध्ये झालेल्या राडेबाजीनंतर सीआरपीएफच्या जवानांमुळे वाचलो, असं अमित शाह म्हणाले.

सीआरपीएफमुळे वाचलो

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आमच्या रॅलीवर दगडफेक केली. त्यावेळी सुदैवाने मी सीआरपीएफमुळे वाचलो. या रोड शोला बंगालच्या जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दोन ते अडीच लाख लोक 7 किमीच्या रोड शोमध्ये होते. त्यावेळी आमच्यावर एक नव्हे तर 3 हल्ले झाले. तिसऱ्या हल्ल्यात दगडफेक आणि केरोसिन बॉम्ब फेकण्यात आले. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असं अमित शाह म्हणाले.


ठाणे : एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना दुसरीकडे कौमार्य चाचणीला विरोध केल्याने त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथमधील विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७० वर्षांचा कालावधी उलटला असून, पुरोगामी महाराष्ट्र जातपंचायतीच्या अनिष्ट रुढीतून मुक्त झालेला नाही. त्यात गेल्या काही काळात कंजारभाट समाजाच्या कौमार्य चाचणीच्या प्रकारामुळे जात पंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तरुणी आणि कुटुंबाला समाजाच्या बहिष्काराच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. अंबरनाथमध्येही कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या एका उच्चशिक्षित दाम्पत्याला जातपंचायतीच्या बहिष्काराला सामारे जावे लागले आहे

विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता, म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने दीड वर्षापासून त्यांना बहिष्कृत केले आहे. विवेक तमायचीकर यांच्या आजीचे निधन झालं. तमायचीकर यांच्या आजीच्या अंतयात्रेत कंजारभाट समाजातील एकही माणूस सहभागी झाला नाही.

त्यामुळेच जात पंचायतीने तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला. तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले त्याचवेळी याच समाजातील एक लग्नाचा हळदी समारंभ सुरु होता. लग्न-हळद हे पूर्वनियोजित असतात हे मान्य आहे, पण या हळदी समारंभात डीजे लावून जल्लोष सुरु होता. एखाद्या माणसाचं निधन झाल्यानंतर परिसरात दुखवटा पाळला जातो. मात्र तमायचीकर यांच्या आजीचं निधन झालं असूनही डीजेचा दणदणाट सुरुच होता, शिवाय त्यांच्या अंत्ययात्रेतही कोणी आलं नाही. गावातील पुढाऱ्याने या अंत्ययात्रेस जाण्यास नागरिकांना मज्जाव केला.केडगाव(शाम कांबळे)

महाराष्ट्र राज्यात नगर बाजार समितीचा चिंचेच्या बाजारपेठेसाठी पहिला क्रमांक लागतो.
 या बाजार समितीत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड,जालना त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी,राहुरी,नगर,जामखेड श्रीगोंदा,नेवासा,पारनेर या तालुक्यातील गावांमधून चिंचेची मोठी आवक येत असते.
 मागील वर्षी पावसाचा फटका बसल्याने चिंचेची आवक कमी झाली आहे. बाजारात काम करणारे व्यापारी,हमाल,मापाडी बैलगाडीवान तसेच महिला कामगार यांना दुष्काळामध्ये चिंचेने रोजगार निर्मितीमध्ये हातभार दिला. 
बाजारामध्ये चिंच पॅकिंगचे काम करणाऱ्या जवळपास १०० महिला आहेत.दोनशे रुपये दिवसाप्रमाणे मजुरी मिळाली.
दोन महिने काम दिवस-रात्र पद्धतीने चालू होते.त्यामुळे महिलांना चांगला रोजगार मिळाला. या चिंचपँकींग मालाला गुजरात,कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात जास्त मागणी आहे.फेब्रुवारी महिन्यात चिंचेचे दर प्रतिक्विंटलला ८ ते ११ हजार रुपये होते.आज ६ ते ७ रुपये दर आहेत.
अन्न रुचकर बनवण्यासाठी व रुची वाढवण्यासाठी चिंचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचेपासुन मिळणा-या चिंचोक्यालाही महत्त्व आले  आहे. चिंचोक्याचा वापर सुपारी प्रमाणे खाण्यासाठी, कुंकू निर्मितीसाठी, स्टार्च निर्मितीसाठी केला जातो. चिंचोक्याचे भाव प्रतिक्विंटल १३०० ते १३५० रुपये आहेत. आता मात्र आवक  संपल्याने बाजारात 
स्मशान शांतता जाणवत आहे.
दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. व्यापारी बाळासाहेब गांधी यांनी बोलताना सांगितले की, "मागील वर्षी पाऊस नसल्याने बाजारात काहीच आवक नाही.
गहू,ज्वारी,बाजरी यासारख्या अन्नधान्याची आवक परराज्यातून मागवली जात आहे.इतर कुठल्याही मालाची आवक नाही,त्यामुळे गिऱ्हाईक नाही.पदरमोड करून खर्च चालू आहे.चिंचेमुळे थोडासा हातभार लागला हे मात्र निश्चित आहे.असे दिवस पुर्वी कधीही नव्हते.

 बाजारामध्ये गाडीवानाचे काम करणारे प्रकाश काळे सांगतात, 
"बाजारात बैलगाडीची संख्या ४० होती. आज २५ बैलगाड्या आहेत.बैलांना चारा विकत घ्यावा लागतो. शहरात कुठेही छावण्या नाहीत.३०० रुपयांचा चारा व खुराक लागतो.खर्च परवडत नसल्याने अनेकांनी बैलजोड्या विकल्या.
खर्च चुकत नाही. 
पदरमोड करावीच लागते.

 त्याचप्रमाणे बाजारात असंरक्षित काम करणारे अनेक कामगार आहेत. दुष्काळामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आता उभा राहिला आहे.
त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांना काही दिवस नवा रोजगार शोधावा लागणार आहे.

Yuvadeheya E News Paper and Portel
       ✍️नितीनराजे अनुसे
           अठराव्या शतकातील जगातील एकमेव महान अशी आदर्श राज्यकर्ती तथा प्रशासनकर्ती म्हणून जगाने ज्या मायमाऊलीचा गौरव त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची  जयंती जवळ येऊन ठेपली आहे. ३१ मे २०१९ रोजी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा २९४ वा जयंती उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असला तरी जयंती साजरी करताना काही गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा असे मला वाटते.
            राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्यासारखे जगातील अनमोल रत्न भारतामध्ये जन्माला यावे हे एकट्या महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर विषेशतः अखंड भारतवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. अहिल्याई होळकर या नुसत्या राज्यकर्त्या/प्रशासनकर्त्या नव्हत्या तर त्या प्रजेच्या, मुक्या पशुपक्ष्यांच्या मायमाऊलीच होत्या. एखाद्या व्यक्त्तीची ओळख ही त्याच्या नावावरून होत नसते तर ती त्याच्या कार्यातून होत असते त्यापैकीच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या एकमेव होत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जागविती। या तुकोबारायांच्या अभंगातून बोध घेत राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी आपल्या राज्यात झाडे लावण्याचे व ती जगवण्याचे फर्मान काढले होते. वड, आंबा, चिंच, फणस अशा सावली देणाऱ्या शिवाय ज्यापासून उत्पन्न मिळेल अशी झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते त्याबदल्यात शेतसारा म्हणून १२ झाडापैकी ७ झाडांपासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांनी स्वतःकडे ठेवायचे तर उर्वरित ५ झाडांचे उत्पन्न महसूल म्हणून सरकारी खात्यात जमा करायचे तीच ही आजची ७/१२ची पद्धत... अशी योजना राबवून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी खऱ्या अर्थाने सृष्टीचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना राबवल्या होत्या आणि आमलात सुद्धा आणल्या होत्या. आजचे राज्यकर्ते/प्रशासनकर्ते हे एसी रूम मध्ये बसून कागदावरच अशा योजना राबवतात आणि कचरा कुंडीत फेकून देतात त्यामुळे आजची ही भयानक परिस्थिती उद्भवली आहे. 
        राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी याव्यतिरिक्त अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायफळ पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याची अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. विधवांना व निपुत्रिकांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. स्वराज्यात अस्पृश्यतेचे उच्चाटन केले. सतीप्रथेस विरोध केला. राज्यात दारूबंदी हुंडाबंदी कायदा लागू केला.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महारानी अहिल्याई होळकर होत. अशा राष्ट्रमातेची जयंती साजरी करत असताना समाजबांधवांनी, सामाजिक संघटनांनी पैशाची वारेमाप उधळपट्टी न करता, डीजे डॉल्बी अशा अवाजवी साधनांचा अवलंब न करता त्याच पैशाचा वापर करून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर समाजोपयोगी उपक्रम राबवून सृष्टीचा समतोल राखण्यास मदत करावी व अहिल्याईंचे विचार लोकांच्या डोक्यात पेरावेत हीच नम्र विनंती.
कृपया व्याख्यात्यांनी/लेखकांनी/विचारवंतांनी विशेषतः या गोष्टींवर भर द्यावा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123

Image result for फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रीज यंत्रणेद्वारे संवाद साधून दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. मंगळवारी त्यांनी नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम या पाच जिल्ह्यातील साधारण शंभरहून अधिक सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेऊन त्याचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच या जिल्ह्यांतील सरपंचांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक व्हॉटसअप क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित आलेल्या तक्रारींवरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी नदी-नाले, विहिरींमधील गाळ काढण्याची मागणी केली. त्यावर संबंधित गावांचा समावेश गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत करून नदी/नाला खोलीकरण, विहिरी व तलावातील गाळ काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

हिंगोली जिल्ह्यातील विशेष दुरुस्ती अंतर्गत जुन्या झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झालेल्या गावांमधील कामासाठी निधीची कमतरता नसून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.मुंबई : भारतीय जनता पक्षाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणार नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत. भाजप सर्वात मोठा ठरू शकतो पण बहुमत नसतानाही मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. मोदी सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांचे सरकार टिकणार नाही. वाजपेयी यांचे बहुमताअभावी १३ दिवसात जसे सरकार कोसळले होते तसे मोदी सरकार कोसळेल असे भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वर्तविले.

शरद पवार सध्या राज्यातील दुष्काळी भागातील दौ-यावर आहेत. त्यांच्यासमवेत नातू रोहित पवार हे सुद्धा आहेत. पवार यांनी नातू रोहित याच्यासोबत प्रथमच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी पवारांनी वरील भाकीत केले.

शरद पवार म्हणाले की, भाजपचे लोक आम्हाला ३०० जागा मिळतील असे सांगतात पण त्याला काही अर्थ नाही. जर उद्या भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रपती संसदेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. पण मोदींना बहुमत सिद्ध करता येणार नाही. अटलजी १३ दिवसाचे पंतप्रधान झाले. तसेच आता झाल्यास मोदी १३ किंवा १५ दिवसाचे पंतप्रधान असतील असा टोला त्यांनी लगावला.चंद्रपूर : चंद्रपुरात अवैध सावकाराच्या जुलुमाला अखेर पीडित महिला बळी ठरल्याची घटना समोर आली आहे. 7 मे रोजी एका खाजगी सावकाराने हरिणखेडे कुटुंबियांच्या घरी जात 1 लाख उरलेल्या रकमेची मागणी केली. यावेळी हरिणखेडे यांनी रक्कम न दिल्याने सावकाराने घरात उपस्थित माय-लेकावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याघटनेत जखमी झालेल्या महिलेचा आज (14 मे) मृत्यू झाला आहे. कल्पना हरिणखेडे अंस मृत महिलेचं नाव आहे.

चंद्रपूर शहरातील सरकार नगरात राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू यांच्याकडून तीन लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी यापूर्वीच केली होती. उर्वरित रकमेतील 60 हजार रुपये 7 मे रोजी देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी जसबीर भाटीया हरिणखेडे यांच्या घरी गेले होते. संपूर्ण कर्ज आजच परत करा असा आग्रह सावकाराने हरिणखेडे यांच्याजवळ केला. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दीक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरनं आपल्या गाडीत ठेवलेल्या बॉटलमधून पेट्रोल काढून अचानकपणे कल्पना हरिणखेडे आणि मुलगा पीयूष यांच्यावर शिंपडले आणि पेटवून दिलं. यात सावकार जसबीरही किरकोळ भाजला. या घटनेमुळं परिसरात एकच आरडाओरडा झाला. तेव्हा शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचवलं. घरात लागलेली आगही विझवण्यात परिसरातील नागरिकांना यश आले.पणजी : गोव्यातील काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडित तरुणी अचानक बेपत्ता झाली आहे. गोवा पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, पीडित तरुणीला शोधण्यासाठी गोवा पोलिसांनी मोहीमही हाती घेतली आहे.

2016 साली पणजी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून अटानासियो मोनसेरेट उमेदवार होते. त्यांच्यावर तरुणीने बलात्कार आणि ड्रग्ज देण्याचा आरोप केला होता. आरोप करणारी तरुणी आता बेपत्ता झाली आहे. ज्यावेळी तरुणीने काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप केला होता, त्यावेळी पीडित तरुणी अल्पवयीन होती.

बलात्कार प्रकरणाचा खटल्याच्या प्रतिक्षेत असणारी पीडित तरुणी गोव्यातील ननद्वारे चालवल्या जाणाऱ्या पुनर्वसन गृहात राहत होती. तिथून 28 एप्रिल रोजी पीडित तरुणी बेपत्ता झाली, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

वेरना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी पीडित तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ननकडून आधी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, 10 मे रोजी पोलिसांनी या तक्रारीला अपहरणामध्ये बदललं. गोवा पोलिसांकडून पीडित तरुणीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

कोलकात्यात अमित शाहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार

कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यापूर्वीच पश्चिम बंगालमधील कोलकात्यात प्रचाराने पातळी सोडून टोक गाठलं आहे. कारण प्रचारादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आजही कोलकात्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले.

कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो निघाला होता. या रोड शोमध्येच हिंसाचार झाला. जाळपोळ आणि दगडफेकही झाली.


अमित शाह यांचा रोड शो कोलकाता युनिव्हर्सिटीजवळून जात असताना, कॉलेज हॉस्टेलमधून दगडफेक सुरु झाली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलला घेराव घातला.

पोलिसांनी जाळपोळ, दगडफेक करणाऱ्यांवर लाठीमार सुरु केला. त्यामुळे हिंसाचार आणखी भडकला. विशेष म्हणजे, हिंसाचारानंतरही अमित शाह यांचा रोड शो सुरुच होता. शाहांच्या रोड शोपूर्वी भाजपचे बॅनर्सही फाडण्यात आले होते.मुंबई : मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र त्या अनुशंगाने गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे पोलीस आणि पोलीस ठाण्यांची संख्याही वाढविणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र तरीही मुंबईत इर्ला या नावाने पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून जवळपास 10 वर्षे उलटले आहेत. मात्र अजूनही इर्ला नावाचं पोलीस स्टेशन अस्तित्वात आले नाही. ते फक्त कागदावरच आहे.

मुंबईत पोलीस स्टेशनची संख्या जास्त व्हावी आणि सुरक्षाव्यवस्था चांगली असावी म्हणून सांताक्रुझ आणि जुहू पोलीस ठाणे विभागून इर्ला पोलिस ठाण्याला दहा वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. 2012 साली त्याबाबत अधिसूचना काढून हद्दही ठरवण्यात आली. 2015 साली 20 अधिकारी आणि 29 कर्मचारी यांची नेमणूकही झाली. मात्र पोलीस ठाण्यासाठी इमारतच नसल्याने हे अधिकारी जुहू आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बसून काम करीत आहेत. पर्यायाने, दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेला इर्ला पोलीस स्टेशन आजतागायत अस्तित्वातच आलेला नाही.संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील विनाअनुदानित अंशत अनुदानित शाळांमध्ये 21 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण कायम पाठपुरावा केला असून यापुढे ही प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तुषार शिंदे, बी.टी. मखरे, एस. एल. क्षिरसागर, डी. आर. खेडकर,एस.बी.गंजरे,एस.एस.भोर,डी.एस.दरेकर व पदाधिकार्‍यांनी आ.डॉ.सुधीर तांबे यांची भेट घेतली.
याप्रसंगी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी रायातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशत अनुदानित व यासंबंधी तुकड्यावर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हा आग्रह आपण कायम ठेवला आहे. याबाबत आपण वेळोवेळी मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून बैठका घेतल्या आहेत. शिक्षण आयुक्तांनाही अनेक वेळा निवेदने दिली आहेत. या पेन्शन योजनेेबाबत मा.रायपाल महोदय यांची सर्व शिक्षक आमदारांी भेट घेतली आहे. त्या प्रत्येक वेळी शासनाने वेळ काढूपणाचे धोरण घेतले असून हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.

विना अनुदानित शाळांवर अनेक कर्मचारी खुप दिवस अत्यंत कमी पगारात काम करतात. व निवृत्ती नंतर ही त्यांना अत्यंत कमी पेन्शन मिळाली तर त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेन्शन योजना सुरु करणे अगदी न्याय ठरणार आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कर्मचार्‍यांनी गोंधळून जाऊ नये. ही योजना लागू व्हावी या संदर्भातील पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबई येथे 21 मे 2019 रोजी सर्व शिक्षक आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शाळांचे प्रश्‍न, शाळांचे अनुदान,शाळा व्यवस्थापन खर्च, शिक्षकांच्या नियुक्त्या असे विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. मुळात गोरगरिबांच्या शिक्षणाकडे या शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असल्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रलंबित ठेवले आहेत.जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्व संघटनांसह न्यायालयीन लढाई सुद्धा केली जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

तुषार शिंदे म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नासाठी आ.डॉ. तांबे यांनी कायम विधानभवनात पाठपुरावा केला आहे.ते जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचे प्रश्‍न,शिक्षकांच्या नियुक्त्या याबाबत त्यांनी कायम पाठपुरावा केला आहे.तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा ठाम विश्‍वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिक्षक संघटनांची विविध पदाधिकारी हजर होते.

कला व क्रीडा शिक्षक नेमावेत
विद्यार्थी सर्वगुणसंपन्न निर्माण व्हावा यासाठी कला व क्रीडा विषय अत्यंत महत्त्वाचे असून या विषयासाठी स्वतंत्र शिक्षक असलाच पाहिजे. अशी आपली कायम ठाम भूमिका आहे असे आ.डॉ. तांबे यांनी सांगितले.


मेरठ (उत्तरप्रदेश) : “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसनने यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात आणखी एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणाऱ्या कमल हसनला आम्ही गांधींजीकडे पाठवू”, अशी धमकी अखिल भारतीय हिंदू महासभेने दिली आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी मेरठमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी त्यांना कमल हसन यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना, “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणारे लोक मूर्ख आणि हिंदू नावावर कलंक आहेत. कमल हसनसारखे लोक घाणेरडं राजकारण करत असून ते स्वत:चा ‘वध’ करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी म्हटलं.

“भारतात कमल हसन, फारुख अब्दुल्ला, नवज्योत सिंह सिद्धू आणि मेहबूबा मुफ्ती यांसारखे राजकारणी दहशतवाद्यांना पाठबळ देतात. दहशतवाद्यांची पाठराखण करण्याचं कामही हेच राजकारणी करत असतात, असेही अभिषेक यांनी सांगितलं.


बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि खूनाची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात ही हत्या झाली. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19) असे मुलीचे नाव आहे.

ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, मुलगा तिला नांदवायला नेत नव्हता. त्यामुळे मुलीने नवऱ्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. आईनेही मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मुलगी माहेरीच राहात होती.

दरम्यान, यामुळे मुलगी ऋतुजा आणि आई संजीवनी हरीदास बोभाटे यांच्यात सारखे वाद व्हायचे. कधी कधी इतर शुल्लक घरगुती कारणांनीही भांडणे व्हायची. हत्येच्या दिवशी देखील मुलीत आणि आईत भांडण झाले. अखेर संतापलेल्या आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर आई संजीवनी बोभाटे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्या.


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी ईव्हीएमबाबत एकाच दिवशी दोन वेगवेगळी विधानं केली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी “आम्हाला ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको” असं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अजित पवार यांनी “ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते, पण काहींच्या मनात शंका आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत साशंकता व्यक्त केली होती. “ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. गुजरात आणि हैदराबादच्या काही लोकांनी माझ्यासमोर मशीन (EVM) ठेवली होती. त्यांनी मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं, पण तिथे मत भाजपला गेल्याचं मी स्वत: पाहिलं. सगळ्याच मशीनमध्ये असं असेल हे मी म्हणत नाही. हे मी पाहिलेलं सांगतो, त्यामुळे मी त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली”, असं शरद पवार म्हणाले होते.

त्यामुळे राष्ट्रवादीत EVM विरोधी भूमिका खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची आहे, तर अजित पवार मात्र शंका नसल्याचं म्हणत आहेत.


नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या ‘नीच’ शब्दाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. त्यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखात मोदींसाठी वापरलेला ‘नीच’ शब्द खरा ठरल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले. मणिशंकर अय्यर यांनी डिसेंबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. काँग्रेसनेही त्यांच्यावर 2 वर्षांची निलंबनाची कारवाई केली होती.

अय्यर यांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. जवाहरलाल नेहरुंच्या शिक्षणाचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या अवैज्ञानिक मतांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का, त्यांनी या अधिकाऱ्यांसमोर काहीही अवैज्ञानिक दावे करावेत? आणि त्या अधिकाऱ्यांनीही पंतप्रधानांना दुरुस्त करण्याचे धाडस दाखवू नये?”

पंतप्रधान मोदी केंद्रीय राखीव पोलीस दलासह (सीआरपीएफ) देशाच्या संरक्षण दलाचा आणि जवानांच्या बलिदानाचा वापर राजकारणासाठी करत आहेत. हे असे करणे म्हणजे देशविरोधी कृती असल्याचाही आरोप अय्यर यांनी केला.


मुंबई : दुष्काळी कामावरुन प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरे यांना शिवसेनेने उत्तर दिलं आहे. “जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

“गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. दुष्काळ हा नैसर्गिक कोप आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावरच्या उपाययोजना सरकारने ठरवायला हव्या. युती सरकारने प्रयत्न केले ते दिसत आहेत”, असं अनिल परब यांनी नमूद केलं.

सरकारचा शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रामाणिक हेतू दिसत आहे. युती सरकारवर जलसिंचनात भ्रष्टाचार झाल्याचा एकही आरोप नाही, असं म्हणत अनिल परब यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला.

प्रश्न राहिला उद्धवसाहेब, मुख्यमंत्री आहेत कुठे? तर त्यांचे काम सुरु आहे. ते दिसत आहे. विरोधक सध्या काही विषय नाही, केवळ आरोप करायचा म्हणून करीत आहेत, असंही अनिल परब म्हणाले.


Image result for जान्हवी मोरे

ठाणे : राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा काल (12 मे) टँकरच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. ही घटना कल्याण शीळ रोडवरील लोढा सर्कल याठिकाणी घडली. ट्रॅफिक पोलिसांच्या समोर भरधाव टँकरने कॅरमपटूचा जीव घेतल्याने कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जान्हवीला राष्ट्रीय कॅरम स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न होते. मात्र ते आता स्वप्नच राहिले आहे.

डोंबिवली पूर्वेतील मेडोज लोढा परिसरात राहणारी जान्हवी मोरे ही राष्ट्रीय स्तरावर कॅरमपटू होती. तिने आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कास्य पदकं मिळवली होती. शाळेत असल्यापासून जान्हवीला कॅरमची आवड होती. ती देशातील अव्वल पाचच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. डिसेंबर 2019 मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. ही स्पर्धा जिंकून तिला अव्वल क्रमांक गाठायचा होता. हेच स्वप्न तिच्या कुटुंबियांचे आणि मित्र मंडळींचे होते.

Image result for राधाकृष्ण विखे

पुणे : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यावेळी कुणा विरोधी नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांसमोर आव्हान उभं केलं नाही, तर त्यांच्याच सख्ख्या थोरल्या भावाने म्हणजे अशोक विखे पाटलांनीच राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात दंड थोपटले आहेत. अशोक विखे पाटलांनी धाकट्या भावाविरोधात अर्थात राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

येत्या 7 दिवसात आपल्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही किंवा कुठलीच कारवाई केली नाही, तर येत्या 20 तारखेपासून लोणीच्या पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषणाला बसेन, असा इशारा अशोक विखे पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव, नगरचे पोलिस अधीक्षक आणि नगरचे जिल्हाधिकारी यांना अशोक विखे पाटील यांनी पत्र पाठवून उपोषणाचा इशारा दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, ते तातडीने द्यावेत.

प्रवरा मेडिकल ट्रस्टला झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून जो पैसा मिळाला त्याची चौकशी झाली पाहिजे.
नगर जिल्हा परिषदमार्फत ज्या जागा भरण्यात आल्या होत्या, त्या कशा पद्धतीने भरण्यात आल्यात त्याची चौकशी करण्यात यावी.

2004 ते 2009 या काळात नगर जिल्हा परिषदेकडून राबवण्यात आलेल्या मध्यान्न योजनेची चौकशी व्हावी.

Image result for मराठा

मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात मराठा आरक्षणाद्वारे प्रवेश द्यावा, अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

“मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॉझिटिव्ह आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना 100 टक्के न्याय देणार आहोत. मात्र, कायदेशीर बाबींची तपसाणी सुरु आहे. कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनाने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना दिले,
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धुमाकुळ सुरुच असून नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जाळपोळ केली आहे. मागील 15 दिवसात गडचिरोलीत घडलेली ही तिसरी जाळपोळीची घटना आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीत ऐमली-मंगूठा रस्त्यावर ही जाळपोळ करण्यात आली. यात रस्त्याच्या कामासाठीचे टँकर, 2 सिमेंट काँक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.

नक्षलवाद्यांनी मध्यरात्रीच्या वेळी जाळपोळ केली. यवतमाळच्या शाम बाबा कन्स्ट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा यांच्याकडे या रस्त्याच्या कामाचा ठेका असल्याचे सांगितले जात आहे. जाळण्यात आलेली वाहने आणि साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या मालकीचे होते.


सोलापूर : बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असे लिहिलेल्या पाट्या पाहायला मिळतात. मात्र, सोलापुरातील माढा शहरात एका सलुन व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क राहुल गांधींचे अस्त्र वापरले आहे. सचिन बाळासाहेब शेलार असे त्या नामी शक्कल लढवलेल्या सलुन व्यावसायिकाचे नाव आहे. उधारीला कंटाळलेल्या सचिन शेलारने थेट ‘राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद’ अशीच पाटी लावली आहे.

सचिन शेलार यांनी आपल्या दुकानातील काचेवर राहुल गांधी यांचा फोटोही लावला आहे. हा फोटो त्यांनी राहुल गांधींचे समर्थक असल्यामुळे लावला नसून दुकानात उधारी होऊ नये म्हणून लावला. त्यामुळे त्यांच्या या दुकानातील पाटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. नोटबंदीनंतर त्याच्या वस्ताऱ्याची धारही काहीशी बोथट झाली आणि त्याच्या उत्पन्नाला फटका बसला. त्या कालावधीत उधारीचे प्रमाण वाढले होते. अखेर उधारीला कंटाळलेल्या सचिन शेलार यांनी या फलकाची शक्कल लढवली. हा फलक लावण्यामागे राहुल गांधींना तुच्छ लेखण्याचा किंवा त्यांची टर उडवण्याचा उद्देश नसल्याचे सचिन शेलार यांनी सांगितले आहे. आज रोख उद्या उधार असा फलक लिहिण्यापेक्षा मी हा वेगळा फलक लिहून उधारीवर काम करण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांना त्यांना भविष्यात उधारीवर काम करुन मिळेल अशी आशा दाखवली आहे, असेही शेलार सांगतात.

Image result for रितेश देशमुख

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर, मोदींच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने आणखी एका हयात नसलेल्या काँग्रेस नेत्यावर टीका केली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर 26/11 च्या हल्ल्याचा संदर्भ देत टीका केली. पियुष गोयल यांच्या टीकेला दिवंगत विलासराव देशमुखांचा मुलगा आणि सिनेअभिनेता रितेश देशमुख याने सडेतोड उत्तर दिले आहे.

पंजाबमधील लुधियाना येथे पियुष गोयल यांनी काँग्रेसवर टीका करताना 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले, “मी मुंबईकर आहे. तुम्हाला जर मुंबईवरील दहशतवादी हल्ला आठवत असेल, तर त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तीन दिवस दहशतवादी गोळीबार करत असताना, सरकारने काहीच केले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे घटनास्थळी एका सिनेनिर्मात्याला घेऊन गेले होते. या निर्मात्याच्या सिनेमात मुलाला (रितेश देशमुख) भूमिका मिळावी म्हणून विलासराव धडपडत होते.”

दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या टीकेला विलासराव देशमुखांचा मुलगा आणि सिनेअभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवरुन सडेतोड उत्तर दिले आहे.


यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझेरियनने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात 21 एप्रिल रोजी सिझेरियन झालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली. परंतु थोडी कळ सोसा, असे सांगत त्यांना अंधारात ठेवण्यात आले. एवढे दिवस कसले उपचार सुरू आहेत, याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर प्रकरणाचा भांडाफोड झाला. याबाबत जास्त कुरबूर केल्यास थेट धमकावले जाते, असा आरोप प्रसूत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रसूती झालेल्या महिलांना टाक्यांमध्ये (टिचेस) इन्फेक्शन झाले असल्याची बाब पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयातील हलगर्जीपणा पुढे आला आहे. या विभागातील एकूण 14 महिलांना अशाच प्रकारचे इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे.

पुसद तालुक्यातील ज्ञानेश्वर पैठणकर यांच्या पत्नीला बाळंतपणासाठी दाखल केले. त्याचे 21 एप्रिलला त्याचे सीझर करण्यात आले. मात्र त्यानंतर 4 ते 5 दिवसांनंतर सुट्टी मागितली असता टाके ओले असल्याचे कारण सांगून थांबविण्यात आले. मात्र रुग्णाला सीझर केलेल्या ठिकाणी टाक्यांमधून रक्तस्राव होत होता. शिवाय वेदना सुद्धा होत होत्या. याबाबत संबंधित विभाग प्रमुखाला सांगितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन उपचार सुरु असल्याचे सांगतले. 8 मेपर्यंत डॉक्टरांनी हीच उत्तरं दिली. त्यानंतर 9 मे रोजी बधीर न करता पुन्हा नव्याने टाके मारण्यात आले आणि रुग्णाला तडफडत ठेवले असल्याचा आरोप सुद्धा नातेवाईकांनी केला आहे.


वर्धा : दुष्काळामुळे माणसांना जेवढा त्रास सहन करावा लागतोय, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास प्राणी आणि पक्षी सहन करत आहेत. वर्धा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. धरणांमध्ये जेमतेम जलसाठा झालाय. बहुतेक धरणं जंगलाने वेढली आहेत. या धरणाच्या पाण्यावर वन्यजीवाची तहान भागते. पण सध्याच्या स्थितीत बहुतेक धरणांनी तळ गाठलाय. जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावर न पोहचणारा वन्यजीव मात्र पाण्यासाठी वणवण फिरत आहे. जिल्ह्याच्या आठ वनपरिक्षेत्रात एकूण 150 कृत्रिम पाणवठे बनवण्यात आले आहेत. या पाणवठ्यावर जंगलातील प्राणी तहानही भागवताना दिसत आहेत.

नजर जाईल तिकडे भेगाळलेली जमीन आहे. एखादं डबकं वगळता जिकडे पाहावे तिकडे धरणाला कोरड पडली असताना तहान तरी कशी भागवायची असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. आपण काहीही प्रयत्न करुन पाणी मिळवू शकतो, पण प्राण्यांच्या काही मर्यादा आहेत. जंगलातील पाणी संपल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यात हे कृत्रिम पाणवठे वरदान बनले आहेत.


चंदीगड : पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा लोकसभा उमेदवार अभिनेता सनी देओलच्या गाडीला अपघात झाला.
प्रचारादरम्यान सनीच्या ताफ्यातील गाडीला एका कारने धडक दिल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सनीच्या रेंज रोव्हरचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे.अपघातावेळी सनी स्वत: गाडीत होता. सुदैवाने या अपघातात कुणाला दुखापत झाली नाही. पंजाबमधील धारीवालजवळ ही घटना घडली.

सनी देओल प्रचार रॅलीसाठी रेंज रोव्हरने जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा टायर फुटला आणि गाडी थेट डिव्हायडरवर गेली. गाडीचा अचानक ब्रेक दाबल्यामुळे सनी देओलच्या गाडीला पाठीमागच्या गाडीनेही धडक दिली. त्यामुळे त्या गाडीचंही नुकसान झालं आहे.अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही तासातच सनी देओलला पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीही घोषित करण्यात आली. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना हे गुरुदासपूरमधून भाजपचे खासदार होते.


चेन्नई : अभिनय क्षेत्रातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या कमल हसनने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तामिळनाडूतील अरावकुरीची इथं प्रचारसभेत बोलताना कमल हसन म्हणाला, “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” कमल हसनच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुस्लिमबहुल परिसरातील प्रचारादरम्यान कमल हसनने हे वक्तव्य केलं. कमल हसन म्हणाला, “हा मुस्लिमबहुल परिसर आहे म्हणून मी हे वक्तव्य करतोय असं नाही, तर माझ्यासमोर गांधींची प्रतिमा आहे. मी याच हत्येचं उत्तर शोधण्यासाठी आलो आहे”.

सर्वांना समान वागणूक मिळेल असा भारत मला हवा आहे. मी एक चांगला भारतीय आहे, त्यामुळे माझी तर तशी इच्छा आहे, असं कमल हसनने नमूद केलं. यापूर्वी कमल हसनने 2017 मध्येही हिंदू कट्टरवादाबाबत विधान केलं होतं. त्यावेळी वाद उफाळला होता.


बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर ते अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगन राजुरी या गावात जाऊन पत्रकार परिषदही घेणार आहेत.

जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आहेत. पण जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्षाविरोधातच भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केल्यानंतर पवार आता स्वतः क्षीरसागरांच्या गावात जात आहेत. बीडपासून जवळच क्षीरसागरांचं राजुरी हे गाव आहे.

क्षीरसागर कुटुंबातही काका-पुतण्याचा संघर्ष आहे. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत. त्यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे संदीप क्षीरसागर हे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणूकच नव्हे, तर यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही क्षीरसागर कुटुंबात वाद पाहायला मिळाला होता.


मुंबई : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेतली. पण ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलंय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या भेटीत केल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. शिवाय नगर जिल्ह्यातील पाण्याचा मुद्दा गिरीश महाजनांसमोर मांडल्याचंही ते म्हणाले.

सध्या विविध मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे दुष्काळी दौरे सुरु आहेत. पण दुष्काळावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन विखे पाटलांनी केलंय. शासकीय पातळीवर सध्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी योजना सुरुच आहेत, पण नगर जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत विखे पाटलांनी गिरीश महाजनांशी चर्चा केली.

दरम्यान, ही भेट राजकीय नव्हती, असं सांगत काँग्रेसमधील राजकीय भूमिकेबाबत अजून काहीही ठरवलेलं नाही, असंही विखे पाटील म्हणाले. गिरीश महाजनांना विरोधी पक्षातील नेत्यांनी भेटणे म्हणजे हे सूचक संकेत मानले जातात. पण विखे पाटलांनी याबाबत नकार दिलाय. गेल्या अनेक दिवसांपासून विखे पाटील भाजपात येणार असल्याच्या चर्चा आहेत. पण विखे पाटलांनी अजून त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.


ठाणे : माझा दुष्काळ दौऱ्याचा कोणताही प्लॅन नाही. दुष्काळाचे टुरिझम करण्यात अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाण्यात आज मनसे पदाधिकाऱ्यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत माहिती घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणाले.

सरकार काय करतंय? अगोदरच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मग आताच्या सरकारमध्ये सिंचनाची काय कामं झाली? 29 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला असेल, तर तुम्ही कामं काय केली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.

सरकार दुष्काळासंदर्भात गंभीर नाही. हे नेते दुष्काळ दौरे करुन काय करतात. महानगरपालिका आणि राज्य सरकारचा फक्त पैसा खर्च करतात. मी दुष्काळी दौरा करणार नाही. दुष्काळी टुरिझम करण्यात पॉईंट नाही, असं राज ठाकरे म्हणाले.


बुलडाणा : मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळा आहे. माणसांच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. यामध्ये राजकीय नेत्यांचे दुष्काळ दौरे सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जिल्ह्यात फिरुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यामध्ये आता काँग्रेसचीही भर पडली आहे. काँग्रेसच्या 11 आमदारांची समिती दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविवण्याचे आदेश महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, जलसंधारण, जलसंपदा आणि ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांना दिले आहेत. दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखडा नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचे दौरे सुरु केले आहेत. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसच्या आमदारांनी बुलडाण्यातून दौऱ्याला सुरुवात केली.

बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचं 11 आजी-माजी आमदारांचं पथक दाखल होणार आहे. दोन दिवस त्यांचा पाहणी दौरा चालणार आहे. तर विदर्भातील दौरा आटोपल्यावर याची नागपूरला सांगता होईल. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या सहा जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदारांचा दौरा असेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget