पिंपळे या खेडेगावातील Mpsc तून निवड होणारा पहिला फौजदार-रामहरी बिन्नरसिन्नर -(प्रतिनिधी)स्वप्नं बघणं आणि ते सत्यात आणणं यात मेहनतीची जोड असावी लागते त्याचंच एक उदाहरण म्हणजे पिंपळे, ता.सिन्नर, जि.नासिक गावचे भुमिपुत्र श्री.रामहरी दगडू बिन्नर यांची Mpsc तून नुकतीच पोलीस उप निरिक्षक पदी निवड झाली. त्याने पिंपळे या खेडेगावातील Mpsc तून निवड होणारा पहिला फौजदार होण्याचा मान मिळवला आहे.

रामचे वडील श्री दगडू विठोबा बिन्नर हे शेतकरी असून शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे, यांचा मोठा मुलगा, रामहरी व मुलगी आशा आणि सुनिता असा मोठा परिवार असून त्यांच्या बेताच्या परिस्थितीत सर्वाना शिक्षण देणे हे शक्य नव्हते याची श्री दगडू बिन्नर यांना याची खंत होती. परंतु मुलगा रामहरी याने शालेय शिक्षण घेत असताना 10 वी मधे ७५ टक्के मार्क्स मिळवुन गोपाल विद्यालय, पिंपळे मधुन प्रथम क्रमांक मिळवला आणि आपली शिक्षणातली आवड बाबांना दाखवून दिली. रामहरी १२ वी सायन्स मधून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने वडिल दगडू बिन्नर यानी मुलगा रामहरी यास उच्चं शिक्षण देऊन मोठा अधिकारी बनवण्याचा निश्चय केला. परंतु आई वडिल अशिक्षीत असल्याने तसेच त्यांचे कुटुंबात कोणीही उच्चंशिक्षित नव्हते किवा नोकरीला नसल्याने 12 वी नंतर काय करावे यबाबत कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही.

तेव्हा रामहरी याने स्वतः ची वाट स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस भरती होण्याचे ठरवले. पिंपळे या खेडे गावातून पोलिस भरतीची तयारी करुन पोलिस खात्यात प्रवेश करने फारस सोपं नव्हतं. रामहरी याने प्रचंड मेहनत, सतत अभ्यास करुन जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर २००९ साली ठाणे शहर पोलिस दलात भरती झाला.

पोलीस खात्यात पदार्पण केल्यानंतरही रामहरीस मोठा अधिकारी बनण्याचे वडिलांचे स्वप्न शांत बसू देत नव्हते. पोलिस नोकरी करत 2012 साली रामहरी याने पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि mpsc ची तयारी सुरु केली. पोलिस खात्यातील १२ ते १४ तास ड्यूटी, बंदोबस्त, मोर्चा, सभा, आणि सुट्यांचा अभाव या सर्व गोष्टीवर मात करत अभ्यास चालू ठेवला. Mpsc चा अभ्यास करताना काही वेळा अपयश आले परंतु खचून न जाता सतत प्रयत्न, मेहनत करुन आज mpsc मधून पोलिस उप निरिक्षक पदावर निवड झाली. आज खऱ्या अर्थाने वडिलांचे स्वप्नं साकार केले हे खुप कौतुकास्पद आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget