मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी लोकांनी फिरवली पाठ !



कल्याण : कल्याणमध्ये भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला मुख्यमंत्री उशीरा आल्याने मुख्यमंत्र्यांनी भाषण तर केले, मात्र भाषणावेळी सभेतील खुर्च्या रिकाम्या होत्या. सभेला विलंब झाल्याने अनेक जणांनी वैतागून सभा सोडून जाणे पसंत केले.

या विजयी संकल्प सभेची वेळ ४ ची देण्यात आली होती. तर ५ वाजता मुख्यमंत्री येणार असे सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला सुमारे ७ वाजले. त्यामुळे सभा सुरु होण्यास तीन तास वेळ लागल्याने नागरिक वैतागले होते.


घरातील कामे आटोपून दुपारपासून अनेक गृहिणी सभा स्थळी आल्या होत्या. मात्र सायंकाळची घरची कामे, जेवण वैगैरे करायचे असल्याने दुपारपासून वाट पहात ताटकळत बसलेल्या या गृहिणींनी संध्याकाळी ७ नंतर आपल्या घरी जाणे पसंत केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.

डिसेंबर २०१८ ला पंतप्रधान मोदी यांनी कल्याणमध्ये जेव्हा सभा घेतली त्यावेळीही मोदींच्या भाषणा दरम्यान नागरिक निघून गेले होते.

तर अर्ध्याहून अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. तीच परिस्थिती आजच्या भाषणात पाहायला मिळाली. त्यामुळे भाषणाच्या दिवशी लागलेली ही गळती निवडणुकीच्या दिवशी पण लागणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget