अकोल्यात तरुणाकडून EVM ची तोडफोड
अकोला : बाळापूर तालुक्यातील कवठा येथे एका तरुणाने ईव्हीएम फोडल्याचा प्रकार घडला. मशीन फोडणाऱ्याचे नाव श्रीकृष्ण रामदास घ्यारे असे आहे. 

पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही घटना बाळापूर तालुक्यातील कवठा येथील बूथ क्रमांक 29 येथे घडली.

आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदानात अनेक ठिकाणी EVM बिघाडामुळे गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अकोला, सोलापूर, बुलडाणा, बीड, लातूर आणि अमरावती या ठिकाणीही EVM मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. 

त्यामुळे या ठिकाणी बराच काळ मतदान झाले नाही. याचा थेट परिणाम मतदानावरही पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्या त्या ठिकाणी पर्यायी EVM उपलब्ध करुन मतदान सुरु करण्यात आले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget