..म्हणून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

जळगाव :- सत्तेत येण्यापूर्वी दिलेले पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे आश्वासन न पाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये लोकांच्या संतापाला सामाेरे जावे लागले. 


जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले व त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर िनदर्शने केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

याप्रकरणी १५ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 'नाबार्ड'च्या निधीतून हे धरण पूर्ण करू, असे आश्वासन सभेत दिले.

निवडणुकीच्या प्रचारासाठी अमळनेरात मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी दुपारी २ वाजता जाहीर सभा झाली.

त्यांचा ताफा मारवड रस्त्यावरून येत असताना पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ताफ्यासमोर निदर्शने सुरू केली.

काही कार्यकर्त्यांनी काळे झंेडेही दाखवले. पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले व त्यानंतर अटक केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget