उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्काराने सन्मानित करावे! - सचिन सावंत

Image result for उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले धारावीत चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो. त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे. या अगोदर मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. परंतु, मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढेल या हेतूने पाहिले जात होते.

 हे समजल्यावर उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे. असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी लगावला आहे.

‘डासभाऊ’ हा शोध लावणा-या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे याकरता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी सचिन सांवत यांनी केली आहे. सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या या शोधामुळे वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. 

डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर कासवछाप अगरबत्ती सह विविध उत्पादने वापरुन डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल याकडे जनतेचा प्रयत्न असायचा परंतु, डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना सारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी. परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधूभावाचे नाते तयार होते, असे उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगतिले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget