राज ठाकरेंचे रेल्वे इंजिन धडाडणार उदयनराजेंच्या गडात




सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे रेल्वे इंजिन सातारा नगरीत आज बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी गांधी मैदानावर धडाडणार आहे. 


मराठी माणसांची अस्मिता जपणारे मनसे सैनिक यांनी या सभेसाठी जोरदार तयारी केली आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवरायांचे वंशज श्री. छ. उदयनराजे व राजसाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्सेही ऐकण्यास मिळणार आहेत. 

त्याचबरोबर राजकारणातील जोड गोळी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर ठाकरी भाषेत होणारे भाष्य ऐकण्यासाठी सातारकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 



युतीने याठिकाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबाबत ठाकरे कोणती नवीन उपमा देणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget