कोणाला गाढव म्हणण्यासारखी आमची संस्कृती नाही - सुशीलकुमार शिंदे

Image result for सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : कोणाला  गाढव म्हणण्यासारखी आमची संस्कृती नाही. मी फक्त काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटायला गेलो होतो ,तिथे अनपेक्षितपणे प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. 

 तिथे असणाऱ्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोटो काढून त्यांनीच व्हायरल केले असा दावा काँग्रेस नेते आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

नुकतेच सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावर काल प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यावरच सडकडून टीका केली होती. “मुद्दामहून कोणाला तरी भेटायचे हे काँग्रेसचे डावपेच आहेत. भेट घेऊन त्याचे फोटो व्हायरल करण्याची कामे काँग्रेसवाले करतात. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे” अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget