उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो

वाराणसी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. त्यातच येत्या 26 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

 उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच 25 एप्रिलला भाजपकडून वाराणसीत भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. या रोड शो दरम्यान 5 लाखांपेक्षा अधिक नागरिक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी विविध लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रचारदौरा, प्रचार सभांचे आयोजन करत आहेत. नरेंद्र मोदी हे देखील गेल्या काही दिवसांपासून देशभरात प्रचारदौरे करत आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशातील मेरठ, सहारनपूर आणि अमरोह या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. त्यानंतर 25 एप्रिलला भाजपतर्फे वाराणसीत भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.

 बनारस हिंदू विद्यापीठ ते दशाश्वमेह घाट असा हा रोड शो असणार आहे. हा रोड शो संपल्यानंतर संध्याकाळी नरेंद्र मोदी गंगा नदीची आरती करणार आहेत. हा रोड शो भव्य दिव्य असा करण्यात येणार आहे. या रोड शोच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांकडे देण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget