पाकिस्तान आणि मनसेचं काय नातं आहे? एकदा तपासलंच पाहिजे!


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मोदी फॉर न्यू इंडिया’ या फेसबुक पेजवर ‘मोदी है तो मुमकीन है’ या जाहिरातीत झळकलेल्या चिले कुटुंबियांना व्यासपीठावर आणून भाजप समर्थकांची पोलखोल केली. 

‘भाजपच्या लावारीस भक्तांकडून’ खोट्या पद्धतीचा प्रचार सुरु असल्याचा आरोप राज यांनी केला. मात्र या सगळ्याबाबत प्रतिक्रीया देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे आणि पाकिस्तानचा थेट संबंधच जोडला आहे.

इम्रान खान यांनी जे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल जे म्हटले त्याचा उल्लेख काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस करत नाहीत. पण राज मात्र वारंवार करतात. त्यामुळे मनसेचे पाकिस्तानी कनेक्शन काही आहे का, हे एकदा तपासलंच पाहिजे असा टोला विनोद तावडेंनी लगावला. 

कदाचित पाकिस्तान डिफेन्सचा यामध्ये संबंध नसेल पण पाकिस्तान आणि मनसेचं काय नातं आहे? असा सवाल तावडे यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget