दत्तक घेऊनही मुख्यमंत्र्यांचे नाशिककडे दुर्लक्ष , राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका !


मुंबई : नाशिकला दत्तक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र दत्तक घेऊनही मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केले? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. शुक्रवारी सायंकाळी नाशिक येथे आयोजित सभेत ते बोल्त होते. शेती, पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यात भाजप कसे अपयशी ठरले, याचा पाढा राज यांनी वाचून दाखवला.
नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी काय केलं? असा प्रश्न राज यांनी यावेळी विचारत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. नाशिक दत्तकी घेण्याची घोषणा करणारा व्हिडीओ राज यांनी यावेळी दाखवला. 

तसेच नाशिकमध्ये मनसेच्या हातात सत्ता असताना केवळ पाच वर्षात मनसेने काय कामे केली हे व्हिडिओद्वारे दाखवले. नाशिककरांनी आमच्या हातून सत्ता घेतली याच वाईट वाटलं पण जी कामं केली ती तेव्हाही छातीठोकपणे सांगितली आणि आताही सांगेन असेही राज यावेळी म्हणाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget