अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले!अमरावती : अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (14 एप्रिल) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे सभा घेतली. 

त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे बॅनर दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही काळ गोंधळ उडाला.

पोलिसांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांच्यासह पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अटक केली आहे. 

या शेतकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना केला आहे. तोपर्यंत या कार्यकर्त्यांना सोडत नाही तोपर्यंत ठाण्यात हटणार नाही अशी भूमिका या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलीआहे यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget