बॉक्सर विजेंदरची राजकारणात उडी; 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूककाँग्रेस पक्षानं बॉक्सर विजेंदर सिंह याला दिल्लीच्या दक्षिण दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली आहे. विजेंदरला उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील सर्व सात जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत.

याआधी सोमवारी सकाळी काँग्रेसनं ६ उमेदवारांची नावं निश्चित केली होती. पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया, नवी दिल्लीतून अजय माकन, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, उत्तर पूर्व दिल्लीतून शीला दिक्षीत आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत.

दक्षिण दिल्लीमध्ये विजेंदर याचा लढा भाजपच्या रमेश बिधूडी आणि आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांच्याशी होणार आहे. दिल्लीमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे.

राजकारणात एन्ट्री केल्यानंतर विजेंदरनं ट्विट केलं की, बॉक्सिंगच्या माझ्या करिअरच्या २० वर्षांहून अधिक काळात मी नेहमीच माझ्या देशाला रिंगमध्ये सन्मानित केलं आहे.


माझ्या देशवासियांसाठी काही तरी करावं आणि त्यांची सेवा करण्याची आता वेळ आली आहे. मी या संधाची स्विकार करतो. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानतो.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget