अथर्व आहेर राज्यस्तरीय ज्युनियर चॅम्पियन शिप मध्ये गोलंदाजी मध्ये प्रथम

गणोरे : - प्रतिनिधी :- वर्धा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय चौथ्या सुपर क्रिकेट राज्यस्तरीय ज्युनियर चॅम्पियन शिप मध्ये गणोरे (ता.अकोले) येथील अथर्व चंद्रराव आहेर याने गोलंदाजी मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवुन सुवर्णपदक पटकवले आहे.त्याची गोवा येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुपर क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र राज्य सुपर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने वर्धा येथे जिल्हा क्रीडा संकुलात चौथ्या सुपर क्रिकेट राज्यस्तरीय चॅम्पियन शिप चे १९ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियन शिप मध्ये पाच संघाने सहभाग घेतला होता. अथर्व चंद्रराव आहेर हा अंबरनाथ संघाकडून खेळत होता.

याने पहील्या डावात दोन ओव्हर मध्ये पाच रन देऊन दोन विकेट घेतल्या तर दुसर्या डावात तीन ओव्हर मध्ये बारा रन देऊन तीन विकेट मिळवत त्याने एकाला झेल बाद करण्यात यश मिळवले. या चमकदार कामगिरी च्या जोरावर त्याने सुवर्णपदक मिळवल्याने ५ मे २०१९ रोजी गोवा येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी त्याची निवड झाली आहे.याबद्दल त्याला सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.त्याला प्रशिक्षक रविंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभले या यशा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget