निवडणुकीच्या तोंडावर धारावी पुनर्विकासाचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा : गायकवाडमुंबई : सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणा-या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपूर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे सांगितले होते. मात्र सत्ताधा-यांचा दावा खोटा असल्याचा आरोप दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. मुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल, अशी भूमिका गायकवाड यांनी मांडली आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भूमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे. २००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे. असा आरोपही गायकवाड यांनी केला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget