शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मोदी-शहा विरोधातील लढा – राज ठाकरे

Image result for राज ठाकरे

मुंबई : नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांच्याविरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय असं मला विचारलं जातं, ह्याचं उत्तर आहे माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांशी लढाई करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्राकडे कूच करायला निघाला, पण दरम्यानचा काळात महाराजांचं निधन झालं होतं. 

असं असताना सुद्धा औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसला कारण औरंजेबाला ‘शिवाजी’ हा शब्द-विचार छळत होता, अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. बुधवारी सायंकाळी सातारा येथे आयोजित सभेत ते बोल्त होते.

लोकांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारे, आश्वासनं देणारे मोदी आज कशालाच बांधील नाहीत. मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांवलर बोलत नाही. आता फक्त पाकिस्तान-पाकिस्तान सुरू आहे. आमचे जवान सीमेवर हकनाक शहीद होतात. मात्र त्याचं यांना काहीही सोयरसुतक नाही. यांना फक्त जवानांवरुन राजकारण करायचं आहे, अशा शब्दांमध्ये राज यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget