उद्धव ठाकरेंनी ईडीला घाबरुन औरंगजेबास मुजरा घातला!




उरण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? ईडीला घाबरुन तुम्ही औरंगजेबास मुजरा घातला. अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी मावळमध्ये जोरदार समाचार घेतला. हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. 


२३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणा-यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget