सर्पदंशावर औषध नसल्याने ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

डोंबिवली : कडोंमपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध नसल्याने ६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. स्वरा वाघमारे असे मृत मुलीचे नाव आहे. वडील प्रमोद वाघमारे हे रिक्षाचालक असून काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे राहण्यास आले होते. काल शुक्रवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरी स्वरा हिला साप चावला. त्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध नसल्याने कर्मचा-यांनी तिच्या नातेवाईकांना दुस-या खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यास सांगितले होते. मात्र तिच्या पालकांनी तिथेच उपचार करण्यासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. सापाचे विष रक्तात भिनल्याने काल सायंकाळी या मुलीचा मृत्यू झाला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget