पवारांच्या पायाखालची वाळू सरकली - विनोद तावडे

Image result for विनोद तावडे

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळु सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

शरद पवार यांच्या प्रचाराच्या भाषेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आज उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, शरद पवार सध्या बुथ वरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करुन माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर या प्रकारची भाषा वापरत आहेत, याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीमध्ये काही खरे नाही. हे बहुधा त्यांना कळले असावे असा टोलाही त्यांनी मारला.

शरद पवार यांच्या मुलीचे काय होईल, अजितदादांच्या मुलाचे काय होईल ? मुलायम सिंह यांच्या मुलाचे काय होईल ? याचा विचार करु नका, तर आपल्या मुला बाळांचे काय होईल याचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करुन लोकांनी मतदान करावं असे आवाहन करताना, या राजकीय नेत्यांनी आपा-आपल्या मुला-बाळांसाठी भरपुर संपत्ती गोळा करुन ठेवलीय. त्यामुळे आपापल्या मुलांचे भले करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्वच निवडून दिल पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget