मतविभागणी हाच वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा : शरद पवार


कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय माहिती नाही, त्यामुळे त्याचा फटका कोणला बसेल हे आताच सांगता येणार नाही. पण जाणीवपुर्वक मतविभागणी करण्यासाठी काही मंडळींनी केलेला हा कार्यक्रम असू शकतो. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.


शरद पवार म्हणाले, मागील निवडणूकीत दिलेली आश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. त्यांच्या टीकेचा रोक जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे आहे, पण ते आमचे घटकपक्षच नाहीत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget