उद्धव ठाकरेंकडूनही आता 'लाव रे तो व्हिडीओ'नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘लाव रे तो व्हिडीओ’ची सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल जे वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत दाखवलं. शिवाय मी लाव रे तो व्हिडीओ म्हणणार नाही, असंही म्हणायला ते विसरले नाही.

उद्धव ठाकरेंनी नाशिकचे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित होते. ज्याला खुमखुमी असेल त्याने 29 तारखेला टक्कर देऊनच दाखवावी, असं आव्हान त्यांनी दिलं. शिवाय आपल्याकडे हेमंत आप्पा, समोर नुसत्या गप्पा, असं म्हणत त्यानी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget