सोलापुरात रंगतदार लढतीत; राज ठाकरेंची एंट्री!सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या सोलापुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उतरला नसला, तरी राज ठाकरे हे राज्यभर फिरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या दोघांविरोधात प्रचार करत आहेत. 


या सभांमधील पहिली सभा नांदेडमध्ये झाल्यानंतर, दुसरी सभा आज म्हणजे 15 एप्रिल रोजी सोलापुरात होणार आहे. सोलापुरात आधीच चुरशीची लढत आहे, त्यात राज ठाकरेंची सभा होणार असल्याने चुरस आणखी वाढेल, यात शंका नाही.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य रिंगणात आहेत. तिन्ही तगडे उमेदवार असल्याने सोलापुरातील लढत चुरशीची ठरली आहे. त्यात भाजपविरोधात प्रचारासाठी स्वत: राज ठाकरे सोलापूरच्या मैदानात उतरल्याने या लढतीला आणखी रंग चढणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget