राज ठाकरेंच्या सभांमुळे 'इतक्या' टक्यांचा होणार परिणाम; मुंडेंचा दावा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधातील प्रचाराला महाराष्ट्रातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


 त्यांच्या सभामुळे महाराष्ट्रातील जनतेला सत्यस्थिती कळू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या प्रचार सभांमुळे एकूण १२ ते १३ टक्के मतदान फिरू शकते, असा अंदाज विधान परिषदेचे विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या गुढीपाडवा सभेपासून मोदी-शहा यांच्या विरुद्ध मोर्चा उघडला आहे. त्यानंतर १२ एप्रिलला नांदेड, १५ एप्रिलला सोलापूर, १६ एप्रिलला कोल्हापूर, १७ एप्रिलला सातारा आणि आज राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. 

या मागील सभांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी भाजप सरकारची आणि मोदींच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली आहे. मोदी पाच वर्षांपूर्वी काय बोलले होते आणि आता त्यांची काय भूमिका आहे. याचे व्हिडिओच ते जनतेला आपल्या भाषणात दाखवत आहेत.

या सभांमुळे भाजप-सेना युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. तशा प्रतिक्रिया या भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून येत आहेत. या राज ठाकरे यांच्या 'ए लाव रे तो व्हिडिओ' वरूनही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात मिम्स तयार करण्यात येत आहेत. परळी जिल्ह्यातील नाथ्रा गावात मतदान केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हा दावा केला. राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या डिजीटल सभांमुळे हा सूर्य हा जयद्रथ होत आहे. त्यामुळे लोकांची मते बदलण्यात मदत होत आहेत. त्यामुळे एकूण १२ ते १३ टक्के मतदानाचा स्विंग पाहायला मिळू शकतो. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget