पवारांना इंजेक्शन देऊन ठार करेनपालघर : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नामक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. महेश खोपकर याने फेसबुकवरुन पवारांना धमकी देणारी पोस्ट टाकली.

 तसेच, महेश खोपकर याने शरद पवारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले. या सर्व प्रकाराचा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून, कारवाई करण्याची मागणीही पक्षाकडून करण्यात आली आहे.

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश खोपकर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन, त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे केली. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदनही दिले.

जर महेश खोपकरवर तात्काळ गुन्हा दाखल केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget