राज ठाकरेंकडून ‘मोदी है तो मुमकिन है’ जाहिरातीची पोलखोल!मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या सभांच्या माध्यमातून करत असलेली पोलखोल पाहता भाजपला धडकी भरली आहे. भाजप या धसक्यातून सावरते तोच राज यांनी पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. ‘मोदी फॉर न्यू इंडिया’ या फेसबुक पेजवर ‘मोदी है तो मुमकिन है’ हि भापजची प्रचाराची टॅगलाईन वापरत एक जाहिरात करण्यात आली. 


मुळात या जाहिरातीतील कुटुंबीयांचा फोटो त्यांना न विचारताच मोदी भक्तांनी परस्पर वापरल्याने भाजपाद्वारे कशी खोटी जाहिरात करण्यात आली आहे याची पोलखोल राज यांनी केली. मंगळवारी सायंकाळी काळाचौकी येथे आयोजित सभेत ते बोल्त होते. यावेळी सभेच्या व्यासपीठावर जाहिरातीतील संपूर्ण कुटुंबियांना बोलवण्यात आले.

भाजपाकडून एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली ह्याचा प्रचार करण्यात आला. या जाहिरातीतील संपूर्ण कुटुंब राज यांनी व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली. तसेच अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही? असा सवाल राज यांनी भाजपाला केला

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget