श्रीपाद छिंदम पुन्हा शहरातून हद्दपार
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला २३ एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. 


तोफखाना पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, कोतवाली पोलीस ठाणे व अहमदनगर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

अहमदनगर शहरातून छिंदमसह २६२ जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. नगरसेवक श्रीपाद छिंदमसह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही हद्दपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदमला त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही हद्दपार करण्यात आले होते. महापालिका निवडणूकीच्या वेळी तुरुंगात असतांना छिंदम निवडूण आला होता.

छिंदमच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्या घरावर हल्ला झाला होता. तेव्हापासून तो चर्चेत आला होता. आता मतदानाच्या तोंडावर त्याला हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे अहमदगरमध्ये त्याचीच चर्चा सुरु आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget