मनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज – आशिष शेलार

Image result for आशिष शेलार

मुंबई : ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना आणि रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना अ‍ॅड. शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे. त्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही अ‍ॅड. शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget