पार्थ पवारांची मदार असलेल्या मतदारसंघात टक्का वाढला, फायदा कुणाला?


रायगड : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 जागांसाठी 57 टक्के मतदान झालंय. या 17 जागांमध्ये सर्वात लक्ष लागलेली लढत म्हणजे मावळची जागा आहे. इथे पवार कुटुंबातली तिसरी पिढी म्हणजे पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्यासमोर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. 

मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन तालुके येतात आणि याच तीन तालुक्यांवर पार्थ पवारांची मदार असल्याचं बोललं जातं. या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला?

मावळ मतदारसंघात एकूण अंदाजे 58.21 टक्के मतदान झालंय. अंतिम आकडा अजून जाहीर केला जाणार आहे. पण सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. मावळ मतदारसंघात पनवेल, उरण, कर्जत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ हे मतदारसंघ येतात. 

यापैकी कर्जत, पनवेल आणि उरणमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंय. यावर टीव्ही 9 मराठीने राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड आणि भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करुन वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला याचा अंदाज जाणून घेतलाय.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget