‘राधाकृष्ण विखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा



मुंबई: राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. तो काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असून, विखेंनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे देणे अपेक्षित असताना पक्षीय पातळीवर त्यांनी राजीनामा दिला असण्याची शक्यता आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी हे शुक्रवारी संगमनेर येथे जाहीर सभेसाठी येत आहेत. मात्र, या सभेला राधाकृष्ण विखे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

मात्र, आपल्या गृह जिल्ह्यात येऊन राज्याचा विरोधी पक्षनेता पक्षाच्या व्यासपीठावर येणार नसल्याने विखेंनी पक्षाकडे राजीनामा सोपविल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच राहुल गांधी यांनी विखेंचा राजीनामा स्वीकारला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget