राज्यात तापमान वाढले, पारा पोहचला ४५ वर


पुणे : हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात आणि मध्यमहाराष्ट्रावर असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह मध्यभारतातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने राज्यात उष्म्याची लाट आली आहे.
पुणे शहरात गेल्या शतकातील सर्वोच्च ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सिंधुदुर्गात गेल्या शतकातील सर्वोच्च ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सरासरी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान असून, अजून ही स्थिती दोन दिवस कायम राहील. 

त्यानंतर तापमानात किंचितशी घट होईल, मात्र राज्याचा पारा चाळीच्या आसपासच राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget