अल्बममध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला



मुंबई : ‘अल्बमध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये’ असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुगली टाकली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. एका जाहिर सभेत मुख्यमंत्र्यांनी ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं’ असे म्हणत राज यांना टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेबद्दल विचारले असता राज यांनी प्रत्युत्तर दिले. ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस सपत्नीक झळकले होते.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी महाराष्ट्रातील विविध भागात सभा घेतल्या. ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेतलेल्या राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. राज यांची पहिली सभा नांदेड येथे झाली होती. यावरून मुख्यमंत्र्यांनी राज यांच्यावर टीका केली होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget