जेट एअरवेजकडे आता फक्त पाच विमाने राहिली शिल्लक


मुंबई: आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजची विमान उड्डाणे कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात. मंगळवारी जेटची फक्त पाच विमाने आकाशात झेपावली. मंगळवारी सकाळी जेटच्या कार्यकारी मंडळाची तीन तास बैठक झाली. 

बँकांकडून मदत न मिळाल्याने काही दिवस उड्डाणे बंद करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन मंडळाने मांडला आहे. सूत्रांनुसार, कार्यकारी मंडळाने अंतिम निर्णयाचे अधिकार सीईओ विनय दुबे यांना दिले आहेत.

दुबे यांनी एसबीआयला तत्काळ ४०० कोटी रुपये देण्याची विनंती करताना म्हटले आहे की, पैसे मिळाले नाहीत तर सध्या सुरू असलेली उड्डाणे बंद करावी लागतील. जेटला कर्ज देणारी आणखी एक मोठी बँक पीएनबीचे एमडी व सीईओ सुनील मेहता यांनी सांगितले की, पैसे देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 

दरम्यान, तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने नाराज झालेल्या वैमानिकांनी पुन्हा एकदा व्यवस्थापनाला इशारा दिला आहे. त्यांच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेचे उपाध्यक्ष असीम वालियांनी यांनी सांगितले की, कंपनीला निधी देण्याबाबत एसबीआय फारशी गंभीर नाही. 

संघटना दिवाळीखोरी कायदानुसार एनसीएलटी मध्ये दाद मागू शकते. प्रकरण लवादाकडे गेल्यास कर्ज परतीस अनेक महिने लागू शकतात.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget