गंगाजल आनण्यासाठी कावडी घेऊन युवकांचे प्रस्थानविविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह कुस्ती हगाम्याचे आयोजन
बिरोबा मंदिराला रंगरंगोटी व विद्युतरोषणाईची सजावटअहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.24 एप्रिल रोजी संध्याकाळी गावातील युवकांनी गंगाजल आनण्यासाठी पारंपारिक वाद्यांसह मिरवणुकीने कावड घेऊन प्रवरा संगमकडे प्रस्थान केला. यात्रेनिमित्त गावातील बिरोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गावातील युवकांचा जथ्था कावडी घेवून रविवार दि.28 एप्रिल रोजी यात्रेच्या दिवशी सकाळी 8 वा. गावात परतणार असून, मोठ्या उत्साहात कावडीची गावामधून डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणुक काढली जाणार आहे. सकाळी 10 वा. श्रीबिरोबा महाराजांच्या मुर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा केली जाणार आहे. सालाबाद प्रमाणे होणार्‍या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 9 वा. छबीना मिरवणुक काढली जाणार आहे. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी आसमंत उजळून निघणार आहे.
दुसर्‍या दिवशी सोमवार दि.29 एप्रिल रोजी दु.4 वा. कुस्त्यांचा हगामा रंगणार असून, जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल हगाम्यात सहभागी होणार आहे. यात्रोत्सवा निमित्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहून, विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवाचे भगत नामदेव भुसारे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सरपंच सुमन डोंगरे, बाबा जाधव, अनशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, रामदास वाखारे, पांडूरंग गुंजाळ, बशीर शेख, संजय डोंगरे, ठकाराम शिंदे, अंबादास निकम, रावसाहेब भुसारे, मयुर काळे आदिंनी केले. यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget