आज रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक


मुंबई : दुरुस्ती कामानिमित्त रेल्वेच्या तीनही मार्गावर आज  (रविवारी ) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग आणि बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणा-या जलद मार्गावर लोकल गाड्या दिवा ते परळदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दु. ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम मार्गावरील बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत ब्लॉक असल्याने सांताक्रूझ ते बोरिवलीदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget