अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी दगडी चाळीत परतणार


मुंबई :- कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक टप्पा पार पडल्यानंतर गवळी 30 एप्रिलला मुंबईत येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली.

अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. 


अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

विशेष म्हणजे, अरुण गवळी याआधीही 2 ते 3 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. आता पुन्हा अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहा बाहेर येणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget