निकालाआधीच ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांचं मोदींना शपथविधीचं निमंत्रणभुवनेश्वर : ओदिशामध्ये बिजू जनता दल (बीजेडी) ने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रणही दिलंय. ओदिशामध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे होत आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे, त्यापूर्वीच पटनायक यांनी पुन्हा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केलाय.

बीजेडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना पटनायक यांनी विजयाचा दावा केला. पहिल्या तीन टप्प्यात बीजेडीला आवश्यक मतं मिळाले आहेत, त्यामुळे राज्यात सरकार आमचंच असेल, असं ते म्हणाले. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानात ओदिशामधील काही जागांचाही समावेश आहे. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

मंगळवारी प्रचार करताना पटनायक म्हणाले, पंतप्रधानांनी जाहीर केलंय, की बीजेडी सरकार गेल्यानंतर मी पुन्हा ओदिशाचा दौरा करण्यासाठी येईल. पण पहिल्या तीन टप्प्यात आम्हाला आवश्यक मतं मिळाले आहेत. त्यामुळे मी मोदीजींना निमंत्रण देतो, की त्यांनी माझ्या शपथविधी सोहळ्यासाठी आवर्जून यावं, असं पटनायक म्हणाले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget