गोव्यात भाजपकडून पर्रिकरांच्या मुलाला तिकीट नाहीपणजी : भारतीय जनता पक्षाने पणजीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या जागेहून मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. मात्र, कार्यकर्त्यांची मागणी मान्य न करता भाजपने पणजीमध्ये माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर केली. याच जागेवरुन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. गेल्या 17 मार्चला पर्रिकरांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पणजीमध्ये 19 मे रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

पणजी विधानसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी, प्रदेश भाजपने पणजी मनपाचे भाजप नगरसेवक, पणजी भाजप मंडळ पदाधिकारी यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर राज्य निवडणूक समितीने सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि उत्पल पर्रिकर यांची नावं केंद्रीय समितीपुढे केली होती. त्यानंतर, भाजपने घराणेशाहीला मागे सारत उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी एका नव्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं. वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात केंद्रीय नेते व्यस्त असल्याने पणजीच्या उमेदवाराच्या नावाची निवड करण्यात उशिर झाला. त्यानंतर आज भाजपने सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पणजी मतदार संघातून दोनवेळा निवडून आले आहेत.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget