किरकोळ पैश्याच्या कारणावरून तरुणाचा खूनपुणे : अडीच हजार रुपयांवरून झालेल्या वादात एकाने मित्राच्या डाेक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर पेट्राेल टाकून ताे जाळण्यात आल्याचा प्रकार घडला हाेता. पिंपरी पोलिसांच्या तपासात पैशांच्या वादातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. 
पिंपरीतील एच ए मैदानावर हा प्रकार झाला होता. याप्रकरणी आकाश दिनकर राऊत (२३ रा. गांधीनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे, तर अजय राजेश नागोसे (१९, रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अजयचा डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाइलवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची पाेलिसांनी तपासणी केली असता आकाश हा घटनेवेळी अजयसोबत असल्याचे समोर आले. तसेच घटनेनंतर तो फरार होता. पोलिसांनी आकाशला बीड येथून अटक केली असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget