वैभव मांगले यांची प्रकृती ठणठणीत


सांगली : वाढलेल्या तापमानामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आली. पण माझी प्रकृती आता ठणठणीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केले आहे.
सांगलीमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आलबत्या-खलबत्या या नाटकाच्या प्रयोगावेळी नाटकाचे मुख्य कलाकार आणि प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे चक्कर येऊन स्टेजवर कोसळले होते. प्रयोग संपण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात ही घटना घडली.

यानंतर नाटक रद्द करत तातडीने संयोजकांनी मांगले यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मांगले यांच्या प्रकृतीबाबत काही क्षणात हार्ट अटॅक आल्याचा अफवा पसरल्या होत्या.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget