विकासाच्या नवीन संकल्पांना साथ देण्याचे आवाहन : मोदी


मुंबई : देशातील काँग्रेसची स्थिती विदारक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सदस्यसंख्या ४४ वरून वाढून ५० पर्यंत जाईल की, ४० वर अडकणार अशी चर्चा सुरू आहे, असा टोला लगावतानाच ही निवडणूक विकल्पाची नाही, तर संकल्प सोडण्याची आहे. मागील पाच वर्षात झालेल्या विकासकामांची पोचपावती या निवडणुकीत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी केले.
मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदावर झालेल्या महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसची कार्यशैली आणि धोरणांवर सडकून टीका केली. 

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. आशीष शेलार, मुंबईतील युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget