भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य जहाजाला आग; एका अधिका-याला वीरमरण


बंगळुरू : कर्नाटकच्या कारवार किनारपट्टीवर उभ्या असलेल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य जहाजाला शुक्रवारी अचानक आग लागली. या आगीत लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांचा गुदमरून मृत्यू झाला.
चौहान हे आगीवर ताबा मिळवण्यासाठी धडपड करत होते. आग विझवताना चौहान बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना जवळच्या नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या शरीरात धूर साचल्यामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. या घटनेनंतर भारतीय नौदलाने तपासाचे आदेश दिले आहेत. सध्या जहाजावर लागलेल्या आगीवर ताबा मिळवण्यात यश आले आहे. मात्र जहाजाला किती नुकसान झाले, हे अद्याप समजलेले नाही.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget