सुजय विखेंकडून लवकरच वडिलांनाही भाजपात आणण्याचे संकेतअहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पदाचा राजीनामा दिलाय, पण त्यांनी अजून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं यामुळे बदलणार आहेत. त्यामुळे आता विखेंच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलंय. 

भाजपवासी झालेले त्यांचे पुत्र सुजय विखे यांनीही वडिलांना भाजपात आणण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनी राजीनामा देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का दिलाय. अशा परिस्थितीमध्ये नगर जिल्ह्यात संपूर्ण विखे गट आता राष्ट्रवादीविरोधात एकवटला आहे.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीने सुजय विखेंसाठी सोडली नाही आणि तिथूनच पुन्हा एकदा पवार विरुद्ध विखे संघर्ष पेटला. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन मी राष्ट्रवादी विरोधात प्रचार करणार, अशी भूमिका घेतली आणि ते मुलाचा छुपा प्रचार करू लागले.

मात्र विखे पाटील विरोधी पक्षनेते असताना थेट भाजपच्या बैठकांमध्ये दिसू लागले. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत ते भाजपात जाणार अशा चर्चांना उधाण आलं, मात्र तसं झालं नाही. आता नगर दक्षिणची निवडणूक संपल्यानंतर विखे कुटुंब शिर्डी मतदारसंघात सक्रिय झालंय. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत घेऊन विखेंचा राजीनामा स्वीकारल्याचं जाहीर केलं.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget