अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं - साध्वी प्रज्ञा सिंह



भोपाळ : भाजपची भोपाळची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरने संतापजनक वक्तव्य केलं आहे. मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केलं आहे. भोपाळ लोकसभेची भाजपची उमेदवार असलेली साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं, असं साध्वी म्हणाली.

एका सभेत साध्वी म्हणाली, “तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितलं होतं. मात्र हेमंत करकरेंनी नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असं म्हटलं होतं”

हेमंत करकरेंची ही कूटनीती होती, देशद्रोह होता, धर्मविरोध होता. ते मला विचारत होते मला सत्यासाठी देवाकडे जावं लागेल का, तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्हाला वाटत असेल तर जा, असं साध्वीने सांगितलं.

साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरेंची तुलना कंसाशी केली. कंसाचा वध जसा श्रीकृष्णाने केला, तसंच देवाने वध केला, असं साध्वी म्हणाली.

भगवान राम कालात रावण झाला, त्याचा अंत संन्यासांद्वारे झाला. द्वापारयुगात कंस झाला तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी श्रीकृष्ण आला, असं साध्वी बरळली.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget