भाजपाचे फसवेगिरीचे तर काँग्रेसचे विकासाचे राजकारण - रामहरी कातोरेसंगमनेर ( प्रतिनिधी ) - 2014 मध्ये मोदींनी मोठ मोठी आश्‍वासने दिली. त्यापैकी एकही आश्‍वासन त्यांनी पुर्ण केले नाही. याउलट काँग्रेसने 70 वर्षात विकासाचे रचनात्मक राजकारण केले आहे. जाहिरातबाजी केली नाही. म्हणून ग्रामीण विकासासाठी पुन्हा कॉँग्रेसचे सरकार आवश्यक असून भाजपाचे सरकार हे ससवेगिरीचे सरकार हे फसवेगिरीचे असल्याची टीका शॅम्प्रोचे अध्यक्ष व जि.प.सदस्य रामहरी कातोरे यांनी केले आहे.

राजापूर, घुलेवाडी येथे आ.कांबळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे, सिताराम राऊत,भाऊसाहेब कुटे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, के.के.थोरात, अभिजीत ढोले, नयना राहाणे, ललिता शिंदे, वंदना गुंजाळ, तुकाराम गुंजाळ, रामनाथ कुर्‍हे, पंढरीनाथ गुंजाळ,नरेंद्र गुंजाळ, जगन आव्हाड, नयना राहाणे आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी कातोरे म्हणाले कि, जनता आता भाजपा कार्यकर्त्यांना विचारत आहेत.अच्छे दिन चे काय झाले. ? खात्यात 15 लाख कधी येणार ? त्यांनी निवडणुकीपुरते दिलेले आश्‍वासन पूर्णता फसले आहे हे सरकार फसवणूकीचे आहे.त्यांच्याकडे कोणतेही ठोस धोरण नाही.ग्रामीण भागात शेती व शेतकर्‍यांचे मोठे प्रश्‍न आहे. भाजपा सरकार हे शेतकर्‍यांचे प्रश्‍न समजून घेत नाही. दुष्काळाची दाहकता वाढत असतांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यांचेकडून ते होत नाही. लोकशाहीला मारक असलेल्या भाजप सरकारने अनेकांचे बळी घेतले आहे. हे सरकार आता रायघटनाच बदलू पहात आहे. रिझर्व्ह बँक,सीबीआय,न्यायालय,पत्रकारीता या क्षेत्रांवर त्यांनी निर्बंध्द लादले आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍या या सरकारला या निवडणुकीतून हद्दद्दपार करण्याची हीच खरी वेळ आहे. सांगत सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार कांबळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष व आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर मोठा विश्वास टाकला असून चांगल्या कामातून आपण हा विश्वास सार्थ ठरवू मागील दहा वर्षात श्रीरामपूरचे आमदार असताना सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक काम केले. पारदर्शक, प्रामाणिक काम हीच परंपरा कायम ठेवून शिर्डी मतदार संघाचे नाव विकास कामातून देशात उवल करू. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकर्‍यांना सरसकट 72 हजार कोटींची कर्जमाफी केली. सर्वांना ती मिळाली. कायम शेतकर्‍यांना मदत केली. मात्र भाजपा सरकारने मोठी जाहिरातबाजी करुन कर्जमाफी केली परंतू खूप जाचक अटी टाकल्या.पती पत्नी घेवून दोन दिवस रांगेत उभे राहून ऑनलाईन फार्म भरले.परंतू 1 रुपयाही कर्जमाफी मिळाली नाही. भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूलथापा देवून शेतकर्‍यांना फसविले आहे. सर्वांनी विकासाचे सरकार आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget