तेथे माझी गरजही भासणार नाही; ती कुस्ती आमचा बारका पैलवानही करील - शरद पवारमंचर: तेथे माझी गरजही भासणार नाही; ती कुस्ती आमचा बारका पैलवानही करील. तुमच्या बापजाद्यांनी सारे काही उभे केले. ते सांगतात की मी मैदान सोडले. त्यांना एवढीच विनंती आहे की, एकदा तरी मैदानात या,' या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान देऊन त्यांच्यावर हल्ला चढविला.

'विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका १४ वेळा लढविल्या; एकदाही पराभव झाला नाही. पुढच्या वर्षी मला ८०वे वर्ष लागेल. त्यामुळे पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे आणि आपण थांबलं पाहिजे.  असे स्पष्टीकरण निवडणूक न लढवण्याबाबद शारदपवार यांनी मंचर येथील सभेत दिले

शिरूर लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सभा मंचर येथे झाली. या वेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

देशासह राज्यही तुमच्याच हातात आहे. यापूर्वी तुमच्याकडे राज्याची सत्ता होती. तेव्हा का नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली? सहकारी कारखानदारी, दुधाचा प्रश्न का नाही सोडवला? त्यामुळे अशा व्यक्तींच्या हाती पुन्हा सत्ता द्यायची नाही, असा निर्णय मतदारांनी घेतला पाहिजे,' असे आवाहनही पवार यांनी केले. 'पुणे जिल्ह्यात विमानतळाची गरज होती.

त्यामुळे विकास झाला असता; शेतमाल जगाच्या बाजारपेठेत गेला असता. मात्र, पंधरा दिवसांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मला खासदार तयार नसल्याचे सांगितले. हे वागणे खासदाराला वागणे शोभते का,' अशी टीकाही पवार यांना आढळरावांवर केली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget