विखे पाटील परिवारातील वाद चव्हाट्यावर,सुजय विखेंच्या अडचणीत वाढअहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व पुतण्या डॉ. सुजय विखे पाटील यांना पाडणे हेच माझे लक्ष्य असून, निवडणूक होईपर्यंत मी नगरमध्ये तळ ठोकणार असे वक्तव्य राधाकृष्ण विखे यांचे थोरले बंधू अशोक विखे यांनी केले आहे. दरम्यान, सख्ख्या चुलत्याने अशी भूमिका घेतल्याने सुजय विखेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
अशोक विखे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. यात ते सुजय विखेंच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत त्यांना एका वाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

अशोक विखे म्हणाले की, माझे वडिल बाळासाहेब यांनी माझ्यासमोर राधाकृष्ण यांना मृत्यूपूर्वी सांगितले होते की जातीयवादी लोकांसोबत कधीही जाऊ नकोस. आपण त्यांच्याशी आयुष्यभर लढलो आहे. त्यांच्यासोबत गेला तर लोकांसमोर कसे जायचे? मात्र आता सुजय विखे भाजपात गेले आहेत. बंधू राधाकृष्ण व वहिनी शालिनीताई या लवकरच भाजपात जाणार आहेत. त्यामुळे मी नगरमध्ये सुजयच्या विरोधात प्रचार करणार आहे.

माझे वडिल बाळासाहेब यांच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी व आजोबांनी उभ्या केलेल्या सर्व वेगवेगळ्या संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माझे आजोबा, वडिलांनी इथल्या लोकांचे भले व्हावे यासाठी या संस्था मोठ्या मेहनतीने उभ्या केल्या आहेत. मात्र, राधाकृष्ण यांनी त्याचा वापर स्वार्थासाठी, सत्तेसाठी व पैशासाठी सुरू केला आहे. विविध संस्थांतील कामगारांचे पगार वेळेवर आता होत नाही, कारखाना तोट्यात गेला आहे. त्याची उलाढाल २५० कोटींनी कमी झाली आहे. याबाबत मी आवाज उठवला. मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्रे लिहली मात्र राधाकृष्ण यांचे सत्ताधारी लोकांशी सेटिंग आहे. मी वेगवेगळी ४०-५० प्रकरणे आहेत. मात्र, भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मुलगा भाजपमध्ये गेल्याने मी दोन वर्षापूर्वी केलेला आरोप खरा होता हे सिद्ध झाला असल्याचे अशोक विखेंनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget