पार्थ पवार यांच्या रुपाने मावळने देशाला सर्वात युवा खासदार द्यावा : धनंजय मुंडे


पुणे : मावळने पार्थ पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून देशाला सर्वात युवा खासदार द्यावा असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळच्या जनतेला केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी – चिंचवड येथील काळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली. यावेळी धनंजय मुंडे यांनी जनतेशी संवाद साधला. या भागात शिवसेनेचे खासदार आहेत मात्र त्यांनी मावळचा काडीमात्र विकास केला नाही. याउलट शरद पवार, अजित पवार यांनी या भागाचा विकास केला असे धनंजय मुंडे म्हणाले.

या भागाने शरद पवार, अजित पवार अशा दोन पिढीतील शिलेदारांना पहिल्यांदा खासदार बनवले असून आता शरद पवारांचा नातू तुमचा आशिर्वाद मागण्यासाठी आला आहे. पार्थ पवारांवर अनेकजण टीका करतात पण त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे याचा विसर विरोधकांना पडू नये अशी समज धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget